वेकोलि कर्मचारी युवतीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर :
नागपूर जिल्ह्यातील उमरेड क्षेत्रातील गोकुळ माईन्स (खदान) च्या २६ वर्षीय महिला कर्मचारीवर १४ ऑगस्ट रोजी भर दिवसा सामूहिक बलात्कार करून दगडाने डोके फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारतीय युथ टायगर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदारां मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनातून केली आहे . 
नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे (वेकोलि) कोळसा खाणीत लिपिक पदावर कार्यरत २६ वर्षीय युवती लघुशंका करिता गेली असता ४ नराधमांनी पाठलाग करून युवतीला पाशवी सामूहिक बलात्कार करून युवतीचे डोके फोडून तिला जीवे मारण्याचा पर्यंत केला. अशा नराधमांना फास्ट स्ट्रोक कोर्टात खटला चालवून बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीचे निवेदन भारतीय युथ टायगर्स संघटना विदर्भ चे शेकडो कार्यकर्त्यांनी बल्लारपूरचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांचा मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले. 
निवेदन देतांना युथ टायगर्स अध्यक्ष प्रशांत झामरे, उपाध्यक्ष प्रशांत मेश्राम, पवन मेश्राम, किशोर पुसलवार, अविनाश शेंडे, जोगेंद्र राणा, श्रीकांत पापुलवार, प्रदीप झामरे, शुभम दुधे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-08-18


Related Photos