नवीदिल्ली- चैन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक वरोरा नजीक ६ तास खोळंबली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा
: नवीदिल्ली-चैन्नई रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ दुरुस्त करणारा ट्रक नादुरुस्त झाला त्यामुळे वरोरा रेल्वे स्थानकापासून नवी दिल्ली कडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या.  नवीदिल्ली- चैन्नई मार्गाची वाहतूक ६ तासानतंर सुरळीत करण्यात रेल्वे प्रशासनास यश आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. 
नवीदिल्ली-चैन्नई रेल्वे मार्गावर वरोरा रेल्वे स्थानक दरम्यान अप लाईनवर ट्रक क्रमांक युपी. ७८-सीएन-१३६१ हा रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सोमवारला सुरु होते. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास सदर ट्रकच्या समोरील चाकाचे बेरिंग तुटल्याने ट्रक रेल्वे लाईनच्या  मधात फसल्या गेला.  ट्रक मध्ये ४० टनाचे साहित्य होते.  रेल्वे प्रशासनाने ट्रक बाहेर काढण्याकरिता अथक परिश्रम घेणे सुरु केले.  परंतु ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य असल्याने ट्रक जागेवरून हलत नव्हता.  त्यामुळे चैन्नई वरून नवीदिल्ली कडे निघालेल्या रेल्वे गाड्या वरोरा रेल्वे स्थानकानजीक व  काही भद्रावती व माजरी येथे थांबविण्यात आल्या . यामध्ये बल्लारपूर, मनमाड पॅसेंजर, दुरोंटो एक्सप्रेसच्या समावेश होता.  अखेरीस रात्री १२.३० वाजताच्या सुमारास   रेल्वे रुळात फसलेला ट्रक काढण्यात रेल्वे प्रशासनास यश आले.  त्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. 

प्रवाशांचे झाले हाल 

अनेक पॅसेंजर रेल्वे गाड्या वरोरा रेल्वे स्थाकाबाहेर थांबविण्यात आल्या . त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. प्रवाशांची  पाणी व खाण्याच्या वस्तू करिता मोठी दमछाक  होत असल्यानेचे  दिसून आले. रेल्वे मार्ग केव्हा सुरळीत होणार याची माहितीही प्रवाशांना मिळत नसल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले होते.    Print


News - Chandrapur | Posted : 2018-09-25


Related Photos