सेवा संकल्प अभियानातून आरसेटी भंडारा प्रांगणाला मिळाली हिरवीगार नवी ओळख


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जनसहभागाचा संदेश देत आरसेटी भंडारा येथे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. आरसेटी भंडाराचे माननीय संचालक मंगलजी निमजे सर यांच्या पुढाकाराने आणि दूरदृष्टीतून संस्थेच्या प्रांगणाला अधिकाधिक हिरवेगार, सुंदर व सुशोभित करण्याचा संकल्प करण्यात आला. प्रशिक्षणाच्या विविध बॅच सुरू असताना प्रशिक्षणार्थ्यांच्या सहकार्याने संस्थेच्या परिसरात विविध प्रकारची फुलझाडे, शोभिवंत झाडे तसेच पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ वृक्षारोपण करून थांबणे नव्हे, तर लावलेल्या प्रत्येक रोपाची नियमित निगा राखून त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे, या भावनेतून या उपक्रमाकडे सातत्याने लक्ष दिले जात आहे.
माननीय मंगलजी निमजे सर यांच्या अथक प्रयत्नांतून, सातत्यपूर्ण देखरेखीमुळे आणि पर्यावरणपूरक दूरदृष्टीतून आज आरसेटी भंडारा परिसरात विविध प्रकारची फुलझाडे, हिरवळ आणि शोभिवंत झाडे बहरताना दिसत आहेत. काही काळापूर्वी साधा भासणारा परिसर आता हळूहळू हिरवाईने नटलेला, प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण निर्माण करणारा परिसर म्हणून आकार घेत आहे. प्रशिक्षणासाठी आरसेटीमध्ये येणाऱ्या युवक-युवतींनाही या हिरव्यागार वातावरणाचा सकारात्मक अनुभव मिळत असून, प्रशिक्षणासोबतच पर्यावरण संवर्धन, वृक्षप्रेम आणि सामाजिक जबाबदारीची भावना त्यांच्या मनात रुजविण्याचे कार्य या उपक्रमातून होत आहे. आपले आरसेटी प्रांगण आपणच वृक्षमय करूया हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचा हा प्रेरणादायी प्रयत्न ठरत आहे.
या उपक्रमासाठी संस्थेतील प्रशिक्षक प्रेषित गजभिये, मंगेश गजभिये, कार्यालयीन सहाय्यक इरफान पठाण, चंद्रकांत हत्तीमारे तसेच परिचर तुषार पिल्लेवान आणि संस्थेतील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. आरसेटी भंडाराच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हाधिकारी महोदयांचे मार्गदर्शन तसेच जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अण्णा ठाकरे सरांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सहकार्य वेळोवेळी लाभत आहे. आरसेटी भंडारा अधिक सुंदर, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि प्रशिक्षणार्थ्यांसाठी पोषक वातावरण असलेले उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र कसे विकसित करता येईल, याबाबत त्यांच्या मार्गदर्शनातून विविध महत्त्वपूर्ण सूचना व दिशा मिळत असतात.
जिल्हाधिकारी महोदयांचे मार्गदर्शन, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक अण्णा ठाकरे सरांचे मोलाचे मार्गदर्शन, संस्थेचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी यांचे सहकार्य तसेच संचालक मंगलजी निमजे सरांची दूरदृष्टी आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यांच्या एकत्रित प्रयत्नातून आरसेटी भंडारा प्रांगणाचा कायापालट हळूहळू होत आहे. भविष्यात आरसेटी भंडारा परिसर हा केवळ प्रशिक्षणाचे केंद्र न राहता हिरवाईने नटलेले, प्रसन्न, प्रेरणादायी, आनंददायी आणि पर्यावरणपूरक आदर्श प्रशिक्षण केंद्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प आहे. प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्यासोबतच सकारात्मक वातावरण, निसर्गाशी नाते आणि पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा मिळावी, हा या उपक्रमामागील व्यापक हेतू आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमामुळे सेवा म्हणजे केवळ समाजासाठी कार्य करणे नव्हे, तर निसर्गाची जपणूक करून पुढील पिढीसाठी सुंदर व निरोगी पर्यावरण निर्माण करणेही होय, हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला आहे. आरसेटी भंडारा परिसरात आज रुजविण्यात आलेली ही रोपे भविष्यात मोठी वृक्ष बनून असंख्य प्रशिक्षणार्थ्यांना सावली, शुद्ध हवा, हिरवाई आणि प्रसन्न वातावरण देतील. त्यामुळे आज करण्यात आलेले हे वृक्षारोपण म्हणजे भविष्यातील सुंदर, हिरवेगार, आनंददायी आणि प्रेरणादायी आरसेटी भंडाराची पायाभरणी ठरत आहे.




Petrol Price




