महत्वाच्या बातम्या

 गडबोरी येथे महिला उमेद ग्रामसंघाच्या प्रयत्नाने आठवडी बाजार सुरु


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / सिंदेवाही : आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी व विशिष्ट स्थानी भरणारा बाजार होय. या ठिकाणी विक्रेते आपापलया  शेतातील माल घेवुन येतात व विक्री करतात. ज्या ठिकाणी भरपुर दुकाने नाहीत व अशी दुकाने असणाऱ्या ठिकाणी जाणे गैरसोयीचे व आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते तेथे अशा प्रकारचा बाजार भरविला जातो. भारतात जास्त करुन ग्रामीण भागात अजूनही अशा प्रकारची व्यवस्था आहे. अनेक शहरातही मोजक्या ठिकाणी असा बाजार भरतो. गावातील आठवडी बाजार ही गावच्या आर्थिक कारणासाठी महत्वाची बाब आहे.

उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, सिन्देवाही तर्फे मातोश्री महिला ग्रामसंघ गडबोरी यांचे १ वर्षाच्या मागणीला अथक परिश्रमांतून हे कार्य साध्य झाले आहे. या ग्रामसंघाची स्थापना ०४ एप्रिल २०१९ रोजी झाली होती. आजपर्यंत या गावात आठवडी बाजार स्वातंत्र्याच्या काळापासून कधी बाजार भरलाच नाही. सर्व्हे ऑफ इंडीयाच्या टोपोशीटवर सुध्दा या बाजाराच्या दिवसाची नोंद असते. या महिलांच्या अथक परिश्रमांतून व लावुन धरलेल्या मागणीला यश आले आहे.

गावाच्या निर्मितीपासुन या गावात आठवडी बाजार भरत नव्हता. वासेरा, नवरगाव, सिन्देवाही येथुन आजपर्यंत लोक बाजार करीत होते. उमेद ग्रामसंघ यांच्या प्रयत्नातून गावातील महिलांना व पुरुषांना गावातच रोजगार मिळावा ही संकल्पना घेवुन रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु झाले. यासाठी बुधवार दिवस निवडण्यात आला. व याच दिवशी गावात एक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी उमेद ग्रामसंघ व ग्रामपंचायत कमेटी यांच्या सहकार्याने आठवडी बाजार सुरु करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे उदघाटक गटविकास अधिकारी अक्षय सुकरे हे होते. सोबत सरपंच शितल उपरकार, उपसरपंच जगदीश बनकर, सचिव अतुल मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य विलास शेंडे, आदेश कोराम, प्रशांत मेश्राम, वंदना बनकर, समिक्षा वसाके, पोर्णिमा मोहुर्ले, सुषमा मेश्राम व कर्मचारी विलास मेश्राम, नितीन रामटेके, चंदु सुरणकर, संदिप उपरकर, ग्रामसंघाच्या अध्यक्षा राधा नेवारे, सचिव कल्पना शेंडे, कोषाध्यक्ष कल्पना गुरु, प्रिया गुरु, अरुणा निनावे, संगिता अगडे, कृषी सखी आनंदे, श्रीरामे, आशिष दर्डा, हर्षद रामटेके, उईके, कांबळे, राजेश कामडी मंचावर उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos