महत्वाच्या बातम्या

 नागपुर येथे गोवरचा शिरकाव : २ पॉझिटिव्ह रुग्ण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : मुंबई, पुनेपाठोपाठ आता नागपुर येथे सुद्धा गोवर हळूहळू पाय पसरत आहे. महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमधील ५ व ८ वर्षांचे २ मुले गोवर पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रण सतर्क झालेले आहे. या मुलांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलेले नव्हते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

गोवर हा कोरोनापेक्षा पाच पट वेगाने पसरतो. गोवर लसीबाबत गैरसमजुतीमुळे अनेक मुले लसीपासून वंचित आहेत. परिणामी, मुंबईत सुरुवात झालेल्या गोवरची साथ आता राज्यभरात पसरली आहे. मुंबईसह पुणे, औरंगाबाद, पिंपरी चिंचवड, बुलढाणा, रायगड, जळगाव, अकोला, धुळे व आता नागपुर येथे ही गोवरचा शिरकाव झाला आहे. महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी गावर्धन नवखरे यांनी सांगितले, महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमधील या दोन्ही मुलांना गोवरची लक्षणे होती. १२ नोव्हेंबर रोजी दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले व ३ डिसेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या मुलांनी गोवर प्रतिबंधक लस घेतले नव्हते.





  Print






News - Nagpur




Related Photos