आंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / विशाखापट्टनम :
बाक्साईट खाणीला आणि उत्खननाला विरोध असल्याने नक्षल्यांनी तेलगु देशम पक्षाच्या एका आमदारासह माजी आमदाराची हत्या केल्याची खळबळजनक घटना आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम जिल्ह्यात घडली आहे.
आमदार किदारी सर्वेस्वरा राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची नक्षल्यांनी हत्या केली आहे. त्यांचे मृतदेह डुंबरीगुडा मंडळात आढळून आले आहेत. बाक्साईट खाण आणि उत्खननाच्या प्रकरणात नक्षल्यांनी आक्रमक भूमिका घेत ही हत्या केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

   Print


News - World | Posted : 2018-09-23


Related Photos