महत्वाच्या बातम्या

 संशोधकाचा खळबळजनक दावा : कोविड-१९ विषाणू मानव निर्मित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
वुत्तसंस्था / वुहान : जगभरात थैमान घालणारा कोविड-१९ हा विषाणू मानव निर्मित होता आणि तो वुहान मधील विषाणू शास्त्र प्रयोग शाळेतून हा विषाणू बाहेर पडला, असा दावा दोन वर्षांपूर्वी जगभरातल्या तज्ज्ञांकडून केला जात होता. मात्र आता चीन मधील वुहान मधील एका तज्ज्ञाने हा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणात पुन्हा खळबळजनक दावा केला गेला आहे. कोविड विषाणू वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या सरकारी संशोधन केंद्रातून दोन वर्षांपूर्वी बाहेर पडला होता. असे अमेरिकेतील संशोधक ऍन्ड्य्रू हफ यांचे निवेदन ब्रिटनमधील द सन या वर्तमानपत्राला दिले होते. त्या बाबतचे वृत्त न्यूयॉर्क पोस्टने प्रसिद्ध केले आहे. ऍन्ड्य्रू हफ यांनी लिहिलेल्या द ट्रूथ अबाऊट द वुहान या पुस्तकात हा दावा करण्यात आला आहे. चीनमधील करोना विषाणूंसाठी अमेरिकेने केलेल्या अर्थपुरवठ्या मुळेच करोनाची साथ पसरली, असे ऍन्ड्य्रू हफ यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. त्यांच्या पुस्तकातील काही अंश द सन या ब्रिटिश वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला आहे. ऍन्ड्य्रू हफ हे न्यूयॉर्कमधील इको-हेल्थ अलायन्स या स्वयंसेवी संस्थेचे माजी उपाध्यक्ष आहेत आणि ते संसर्गजन्य रोगांवर संशोधन करत असतात. चीनमध्ये करण्यात आलेल्या प्रयोगांच्या वेळी पुरेशी काळजी घेण्यात आलेली नव्हती, असे हफ यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. त्यामुळेच वुहानमधील प्रयोग शाळेतून हा विषाणू बाहेर पडला, असे न्यूयॉर्क पोस्टने म्हटले आहे. कोविड-१९ साथ पसरायला लागली तेव्हा पासून वुहान मधील प्रयोग शाळा वादाच्या भोवऱ्यात आहे. मात्र चीन सरकार आणि वुहानच्या प्रयोग शाळेच्या व्यवस्थापनाने हा विषाणू आपल्या प्रयोगशाळेत तयार झाला नसल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. विदेशी प्रयोग शाळांमध्ये जैवसुरक्षा, संभाव्य धोक्‍यांचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या पुरेशा उपाययोजना नसतात. त्यामुळेच हा विषाणू या संशोधन केंद्रातून बाहेर पडल्याचे हफ यांनी म्हटले आहे. त्यांची संस्था दशकभरापेक्षा अधिक काळापासून वटवाघळांवरील विषाणूंवर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ बाबत संशोधन करत आहे. वुहानमधील संशोधन केंद्राशीही या संस्थेचे निकटचे संबंध आहेत. करोना विषाणू वुहानच्याच प्रयोगशाळेत तयार केलेला आहे. हे चीनला प्रथम पासूनच माहीत आहे. असेही हफ यांनी म्हटले आहे.





  Print






News - World




Related Photos