राज्यातील ९३० ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७९ टक्के मतदान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई :
राज्यातील विविध २६ जिल्ह्यांमधील ९३० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सरासरी ७९ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हे मतदान झाले. यात ९३० ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३०  पासून सायंकाळी ५.३०  पर्यंत होती. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी ७.३० पासून दुपारी केवळ ३  पर्यंतच मतदानाची वेळ होती. मतमोजणी उद्या २७ सप्टेंबर रोजी होईल.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 5, रायगड- 96, रत्नागिरी- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 20, धुळे- 74, जळगाव- 5, अहमदगनर- 66, नंदुरबार- 54, पुणे- 47, सोलापूर- 59, सातारा- 32, सांगली- 1, कोल्हापूर- 15, बीड- 2, नांदेड- 12, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 2, नागपूर- 373, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 2 आणि गडचिरोली - 4. एकूण- 930.  Print


News - Rajy | Posted : 2018-09-26


Related Photos