महत्वाच्या बातम्या

 अनुकंपा तत्वावर गट-क व गट-ड च्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना समुपदेशन प्रक्रिया ०४ नोव्हेंबर रोजी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सन २०२६ या वर्षात अनुकंपा तत्वावर गट-क व गट-ड च्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेव्दारे निवड करण्यासाठी दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके सभागृह, जिल्हा परिषद, गडचिरोली येथे मुळ शैक्षणिक व इतर आवश्यक दस्तऐवजासह उपस्थित राहण्याबाबत कळविण्यात आले होते.

याव्दारे सर्व पात्र अनुकंपाधारक उमेदवारांना कळविण्यात येते की, दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजितकरण्यात आलेली अनुकंपा तत्त्वावरील पदभरती पालकमंत्री, गडचिरोली जिल्हा व मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गडचिरोली हे सदर समुपदेशन प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव दिनांक ०२ नोव्हेंबर २०२६ रोजी ऐवजी दिनांक ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सर्व संबंधित उमेदवारांनी आपली मुळ कागदपत्रे व आवश्यक दस्तऐवजांसह वेळेवर उपस्थित राहावे. याची सर्वसंबंधितांनी नोंद घ्यावी. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.





  Print






Related Photos