दहीहंडी फोडतानाची एकात्मता प्रत्येक समाजकार्यात यावी : पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
विशेष प्रतिनिधी / अहेरी : 
ज्याप्रमाणे दहीहंडी फोडण्यासाठी जाती, पंथ, पक्ष, भाषा यांचे भेद दूर सारून समाज एकत्र येतो आणि एकात्म होतो. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या या हंडीतील अमीट गोडवा प्राशन करून व त्यापासून प्रेरणा घेऊन समाजातील दुषप्रवृत्तीचा नाश करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असा संदेश राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव महाराज आत्राम  दिला.
विश्व हिंदू परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त श्रीराम जन्मोत्सव समिती व बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने "भव्य दहीहंडी स्पर्धा - २०१८" चे आयोजन गोकुळाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. अहेरी शहरातील विश्वेश्वरराव महाराज चौक येथे ही भव्य दहीहंडी स्पर्धा संपन्न झाली. जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्थानावरून आलेल्या सहा गोविंदा समूहांनी दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. सिरोंचा चा संघ त्यात विजयी ठरला. 
 यावेळी  त्याचप्रमाणे राष्ट्रपती शौर्य पुरस्कार प्राप्त महेश दत्तूजी जाकेवार या तरुणाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव  करण्यात आला.  यावेळी  अहेरी न. प. च्या अध्यक्षा हर्षाताई ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री अमित बेझलवार, कार्यक्रमाचे मुख्य वक्ता बजरंग दलाचे विदर्भ प्रांत संयोजक अमोल अंधारे, प्रमुख उपस्थिती म्हणून बजरंग दलाचे चंद्रपूर विभाग संयोजक पराग दवंडे, विहिंप चे संदीप कोरत, दिघु खतवार, विनोद जिलेला त्याचप्रमाणे श्रीराम जन्मोत्सव समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भारतीय जनता पक्ष आदींचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आदी मान्यवरांसोबतच प्रचंड मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-04


Related Photos