महत्वाच्या बातम्या

 बोरखेडी प्रकल्पाच्या १०० मीटर परिसरात झाडे लावणे, खड्डे खोदणे व बांधकामांवर निर्बंध


- जिल्हा प्रशासनाकडून सार्वजनिक सूचना जारी

 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) प्रकल्प, बोरखेडी येथील  सुरक्षेच्या दृष्टीने नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. या सार्वजनिक सूचनेनुसार, बोरखेडी येथील डीआरडीओ प्रकल्प परिसराच्या बाह्य सीमा भिंतीपासून १०० मीटर अंतराच्या परिसरात झाडे लावणे, घरे बांधणे, खड्डे खोदणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. 

याबाबातचा सविस्तर तपशील अधिसूचनेसोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये नमूद करण्यात आला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी ‘वर्क्स ऑफ डिफेन्स ॲक्ट, १९०३’च्या कलम ३(२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ही सूचना जारी केली असून संबंधित जमिनीचा नकाशा जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष भूसंपादन अधिकारी (सामान्य) यांच्या कार्यालयात पाहणीसाठी उपलब्ध आहे.

या सार्वजनिक सूचनेनंतरही संबंधित परिसरात कोणतेही अनधिकृत काम किंवा बांधकाम केल्यास ते बेकायदेशीर ठरवले जाईल. तसेच, असे बांधकाम तातडीने पाडून टाकण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींविरुद्ध नियमांनुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.






  Print






Related Photos