महत्वाच्या बातम्या

 नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी १ ऑक्टोंबरपासून नोंदणी


- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांची माहिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 साठी एक आक्टोंबर पासून मतदार  नोंदणी प्रक्रीया सुरू होत आहे. पात्र शिक्षकांनी निवडणूक आयोगाने जारी केलेला फार्म 19 भरून मतदार व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज येथे केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहामध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 1 ऑक्टोबर 2022 पासून मतदार नोंदणी अधिनियम 1970 च्या कलम 31 ( 3 ) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक 2023 साठी निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.

25 ऑक्टोबरला दुसरी व अंतीम सूचना प्रसारित झाल्यानंतर 7 नोव्हेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. प्रारूप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक 25 डिसेंबर 2022 आहे मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 30 डिसेंबर रोजी होणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक ऑक्टोबर 2022 पासून तर 9 डिसेंबर 2022 पर्यंत दोन टप्प्यांमध्ये आपल्या नावाची नोंदणी करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. यासाठी निवडणूक विभागाचा नमुना 19 भरणे अनिवार्य आहे.


कोण करू शकतो मतदान

नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील माध्यमिक व त्यावरील शैक्षणिक संस्थांमध्ये एक नोव्हेंबर 2016 ते 1 नोव्हेंबर 2022 या सहा वर्षाच्या कालावधीत सलग किंवा टप्प्याटप्प्याने किमान तीन वर्ष शिक्षक म्हणून सेवा केलेला शिक्षकच यासाठी पात्र मतदार आहे. शैक्षणिक कार्य केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाचा फॉर्म 19 भरणे प्रत्येकाला अनिवार्य आहे. शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी प्रत्येक निवडणुकीला नव्याने मतदार यादी तयार होते यासाठी दरवेळी नव्याने अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत मतदारालाच मतदान करण्याचा हक्क आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos