गडचिरोली येथील सहायक वीज अभियंत्याची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मागच्या भागात बांधकाम विभागांतर्गत विद्युत विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयात मृत केशव आखाडे (२७) हा सहायक वीज अभियंता म्हणून कार्यरत होता. आज दुपारी कार्यालयात कुणीच नसताना त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली.
सहायक अभियंत्याने कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. केशव हा अविवाहित होता. वाशिम जिल्ह्यातील सिल्लोड येथील मूळ रहिवासी असलेला केशव चार-पाच महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करुन गडचिरोली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात सहायक अभियंता पदावर रुजू झाला होता. अशी माहिती आहे. मात्र, त्याने आज आत्महत्या केली.
घटनेनंतर पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेहाचा पंचनामा केला, पोलिस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. केशव खाडे याने कामाच्या ताणामुळे आत्महत्या केली की त्यामागे अन्य दुसरे कारण आहे. याविषयीचा उलगडा पोलिस तपासातच होईल. मात्र, एका तरुण अभियंत्याने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli