महत्वाच्या बातम्या

 पावसाने नदी-नाले दुथडी : ४८ तासांसाठी येलो अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यासह नद्यांच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. २४ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात सरासरी ४८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, देसाईगंज तालुक्यात तब्बल ८७.५ मि.मी. पावसासह अतिवृष्टी झाली आहे. या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांची

देसाईगंज मंडळात सर्वाधिक ११७.० मि.मी. पाऊस झाला आहे. याशिवाय ८ महसूल मंडळांमध्ये जोरदार पाऊस झाला.पाणीपातळी कमालीची वाढली असून, इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा दिला. जिल्ह्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा शनिवारी मध्यरात्री ठिकठिकाणी झालेल्या पावसाने भरून काढली. त्यानंतर रविवारी सकाळी व रात्री जिल्ह्यात अनेक पाऊस बरसला. ठिकाणी अमिर्झा-मौशिखांब मार्गावरील पाल नाल्यावर सोमवारी सकाळी पूर होता.

मुसळधार पावसाचा अंदाज -
नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार २५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच, जिल्ह्यातील एक-दोन ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

अहेरी उपविभागात पूरस्थितीचे सावट -
संततधार पावसामुळे इंद्रावती नदीची पाणीपातळी वेगाने वाढत आहे. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास इंद्रावती नदीची पाणीपातळी चिंदनार केंद्रावर इशारा पातळीवर पोहोचली, तर जगदलपूर केंद्रावर नदीने थेट धोक्याची पातळी ओलांडली आहे.





  Print






Related Photos