जुन्या वादाचा राग मनात ठेवून वृद्धाची हत्या : सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील घटना
- आरोपीला अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : पोलीस स्टेशन अंतर्गत पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मेंढा माल येथे अज्ञात इसमाकडुन वृद्धाची हत्या केल्याची घटना २८ सप्टेंबर २०२२ ला रात्री ११:५५ वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने गाव परिसरात खळबळ उडाली आहे. सिंदेवाही पोलीसांनी घटनेचा तपास सुरु केला असून आरोपीला अटक झाली आहे.
मेंढा माल येथील रहिवासी मय्यत ईश्वर कवडु परचाके (६०) हा आपल्या नातीनसह राहत होता.
रात्रौ ११: ४५ च्या सुमारास आपल्या घरात नातिनसह झोपले असताना दोन अज्ञात इसम घरी आले होते. अज्ञात इसमाने ईश्वर परचाके यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार करून मारेकऱ्यांनी तिथुनच पळ काढला.
सदर घटनेमुळे नातीनने घाबरून आरडाओरड केली. सदर दोन अज्ञात इसमाकडुन वृद्धाची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
सदर घटनेची माहिती होताच पोलिस अधीक्षक साळवे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांनी घटनास्थळी भेट देवून संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिंदेवाही पोलिसांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. अथक परिश्रमानंतर सदर गुन्ह्यामधील अज्ञात मारेकरी यांना अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळाले. गिरगाव येथे राहणारे नामदेव तुकाराम आत्राम व त्याचा साथीदार, धर्मराज घनश्याम येवणकर यांनी जुन्या वादाचा राग मनात ठेवून सदरचे क्रूर कृत्य केले असल्याची कबुली पोलिसांना दिलेली आहे. पोलीस निरीक्षक योगेश घारे, पीएसआय महल्ले, आणि सर्व पोलिस अधिकारी यांनी तत्काल गुन्हेगाराना अटक केली.
News - Chandrapur