महत्वाच्या बातम्या

 आदर्श महाविद्यालयाने एड्स दिनानिमित्त रॅलीद्वारे केली जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शहर प्रतिनिधी / देसाईगंज : वचन पाळा आणि एड्स टाळा, असा नारा देत आदर्श कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश हलामी यांच्या नेतृत्वाखाली एड्सच्या जनजागृती विषयक रॅलीचे काढण्यात आली. यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. जे. पी. देशमुख यांनी सर्वप्रथम एड्स रॅलीला संबोधित केले आणि रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. जगभरातील लोकांना एचआयव्ही संसर्गाबाबत जागरूक करण्यासाठी जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक आरोग्य संघटनेने प्रथम ऑगस्ट 1987 मध्ये जागतिक एड्स दिन आयोजित करण्यास सुरुवात केली. हा दिवस आयोजित करण्यामागचा उद्देश सर्व वयोगटातील लोकांमध्ये एड्सबद्दल जागरुकता निर्माण करणे हा आहे. या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी एचआयव्ही संसर्गाबाबत जागरूक करण्यात अनेक घोष वाक्य देत देसाईगंज येथील मुख्य रस्त्यावरून बसस्थानक, बाजारपेठ, फवारा चौक, नगर परिषद, पोलिस स्टेशन मार्गाने रॅली काढण्यात आली. रॅलीचे आयोजन यशस्वी करण्याकरिता प्रा. श्रीकांत पराते, प्रा. अमोल बोरकर, प्रा. संजय परशुरामकर, प्रा. दिपाली मैंद, प्रा. प्राजक्ता सुखदेवे, प्रा. प्रिती मेश्राम सहभागी होऊन सहकार्य केले. या रॅलीत उपस्थितांचे आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ राजू चावके यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos