महत्वाच्या बातम्या

 सामाजिक न्याय विभागाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमीत्त व्याख्यानाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : समाज कल्याण विभागाची स्थापना होवून 90 वर्षे पूर्ण झाल्याने सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, यांनी राज्यात 15 ऑक्टोंबर, 2022 रोजी सामाजिक न्याय विभागाचे वर्धापन दिनाचे आयोजन करुन त्याच दिवशी विविध कार्यक्रमाचे सुध्दा आयोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुषंगाने भंडारा जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त श्रीमती सुकेशिनी तेलगोटे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, भंडारा येथे सामाजिक न्याय दिनानिमीत्त जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

त्यानिमीत्ताने 15 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी 9.30 वा. अभ्यासिकेतील तसेच वसतिगृहातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोहित मत्तानी, जिल्हा पोलीस अधिक्षक, भंडारा यांचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सदर व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाजकार्य महाविद्यालय, सर्व वसतिगृह, निवासी शाळेत व विविध वृध्दाश्रम व दिव्यांग संस्थांमार्फत विद्यार्थ्यांकरीता निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कौशल्य विकास, वाचन स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन तसेच स्टॅण्डअप योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता ग्रामपंचायत गणेशपूर येथे आयोजन करण्यात आलेले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos