महत्वाच्या बातम्या

 सपना मोरे यांची काँग्रेस विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या शिफारशीनुसार सौ.सपना सिद्धार्थ मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या विचार विभागाच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस विचार विभागाचे प्रदेशाध्यक्ष खलील सैफ सय्यद यांनी ही नियुक्ती केली.

नियुक्तीनंतर सपना मोरे यांनी ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, चंद्रपूर जिल्ह्याच्या खासदार प्रतिभा धानोरकर तसेच आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सपना मोरे यांच्या नियुक्तीबद्दल नगरपालिकेचे उपाध्यक्ष देवेंद्र आर्य, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष करीम, परिवहन विभाग काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष नरेश मुंदडा, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष नरेश आनंद, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष इस्माईल ढाकवाला, नगरसेवक भास्कर माकोडे, डेव्हिड कॉम्पेली, अनिल खरतर, गणपत इटनकर, संजय जिल्हावार, कासीम भाई आणि शरद अलोनी यांनी अभिनंदन केले.





  Print






Related Photos