महत्वाच्या बातम्या

 रेल्वेखाली येऊन २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू


- वडसा-अर्जुनी रेल्वेमार्गावरील घटना; देसाईगंज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज : वडसा ते अर्जुनी रेल्वेमार्गावर रेल्वेखाली आल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. शंकर केशव बेदरे (२५ वर्षे, रा. कन्हाळगाव, ता. लाखांदूर, जि. भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकर बेदरे हा ११ ऑक्टोबर रोजी सकाळी शेतावर पेरणीच्या कामासाठी गेला होता. दरम्यान, वडसा ते अर्जुनी रेल्वेमार्गावरील पोल क्रमांक ११०४/०७ ते ११०४/०८ दरम्यान दुपारच्या सुमारास तो रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर देसाईगंज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर याचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत अधिक तपशील उपलब्ध झालेला नाही. या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.





  Print






Related Photos