डोंगरी का सुलतान फेम मुझतबा अजीज नाझा कव्वालीत रिझविले : अहेरीत कव्वालीचा शानदार मुकाबला


- आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस व विजयादशमी उत्साहात प्रेक्षकांची तुडूंब गर्दी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : डोंगरी का सुलतान फेम सुप्रसिद्ध कव्वाल मुझतबा अजीज नाझा व सुप्रसिद्ध कव्वाला गीता सिंग चिस्ती यांनी २०ऑक्टोबर मंगळवार रोजी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस व विजयादशमीच्या शुभपर्वावर आमदार धर्मराव बाबा आत्राम फॅन्स क्लबच्या वतीने बाजारवाडीच्या मैदानात प्रेक्षकांना रिझविले.
कव्वालीचे आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी फित कापून थाटात उदघाटन केले.यावेळी सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम, ज्येष्ठ नेत्या पूष्पाताई अलोणे, रियाज शेख, सुरेंद्र अलोणे, सारिका गडपल्लीवार, नागेश मडावी, आदित्य जक्कोजवार आदी मान्यवर उपस्थित होते.डोंगरी का सुलतान फेम सुप्रसिद्ध कव्वाल मुझतबा अजीज नाझा व सुप्रसिद्ध कव्वाला गीता सिंग चिस्ती यांनी समधुर व सुरेल आवाजातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
मुझतबा अजीज नाझा यांनी चढता सुरज, झूम बराबर झूम, शिर्डी वाले साईबाबा डोंगरी का सुलतान व भीम गीतांवर युवकांनी चांगलाच ठेका धरले. कव्वालीत प्रेक्षकांची तुडूंब गर्दी होती. एकंदरीत आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस व विजयादशमीची अहेरी राजनगरीत एकच धमाल झाली.




Petrol Price




