गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये गोंडवाना सैनिक विद्यालयाच्या खो-खो संघातील खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ही निवड मिळविली.
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये ओम मनोज मासावार, हर्सल पुरनसिंग कारेपाल, अमन हर्षीत बिसवास, श्लोक मंगेरी पोटवार, सौरभ अतुल मोरे, श्रवण वसंत उसेंडी, सात्विक संतोष पाले, अर्थव राजेश उसेंडी, ध्रुप आषीश हलामी, निशांत मधुकर गोरा, आयुष मनोज वासेकर, आयुष कृष्णकांत भरे, युयान बंडू गोरा, अनुज संजय कुपे आणि केतन तुलसीराम ठलाल यांचा समावेश आहे.
खो-खो या सांघिक खेळात वेग, चपळता, अचूक निर्णयक्षमता, संघभावना आणि शारीरिक तंदुरुस्ती यांना विशेष महत्त्व असते. विद्यालयाच्या खेळाडूंनी या सर्व गुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आपल्या खेळाची गुणवत्ता सिद्ध केली. नियमित सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्तरावर स्थान मिळविले आहे.
या खेळाडूंना क्रीडा प्रशिक्षक भूपेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव करून स्पर्धेसाठी तयारी केली.या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, शिक्षकवृंद व क्रीडा विभागाच्या वतीने सर्व निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे व गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.




Petrol Price




