दोडूर प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेविका राहते गैरहजर, गावकऱ्यांनी उपकेंद्राला ठोकले कुलूप


- नागरिकांची जि.प.च्या सिईओंकडे तक्रार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / एटापल्ली :
तालुक्यातील जांबिया प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या दोडूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत आरोग्य सेविका स्नेहा बन्सोड मागील दोन वर्षांपासून सतत गैरहजर राहत असून या भागातील नागरिकांना कोणतीही आरोग्य सेवा पुरवित नाही. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हगवण, उलट्या, मलेरिया, टायफाईड, गरोदर मातेचे संगोपन, लहान मुलांचे लसिकरण आदी गंभीर स्वरूपाच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे आरोग्य सेविकेवर कारवाई करून दुसरी आरोग्य सेवा द्यावी या मागणीसाठी   आरोग्य उपकेंद्राला कुलूप ठोकले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३० आॅगस्ज्ञट रोजी सकुलू घुसू कोवासे आणि मंजी गावडे हे दोघे आरोग्य सेविकेच्या निष्काळजीपणामुळे दगावले आहेत. दोडूर हे गाव तालुका मुख्यालयापासून ५२ किमी अंतरावर आहे. तसेच नक्षलग्रस्त व अतिदुर्गम आहे. या भागात कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा नाहीत. असे असतानाही आरोग्य सेविका स्नेहा बन्सोड ह्या सेवा बजावत नाहीत. यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 
निवेदन देताना ग्र्रामसभा अध्यक्ष पत्तू पोटामी, सदस्य मानसिंग मत्तामी, कुल्ले वंजा कोवासे, बुधा मिरगु कोरसा, अजय कोरसा, नागेश कोरसा आदी उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-09-14


Related Photos