जि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक जिल्हा परिषदेसमोर घोट येथील ग्राम रोजगार सेवीका गीता पोगुलवार यांनी विविध मागण्यांसाठी १७ ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरु केले आहे . आज जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे सांगितले.
 यावेळी जि. प. सदस्य राम मेश्राम, बानय्या जनगाम आदी उपस्थित होते. 
घोट येथील ग्राम रोजगार सेवीका गीता पोगुलवार यांनी सर्वे न . ७७ व ७८ योग्य चौकशी करून तांत्रिक अधिकारी व इतरांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करा, 
 गेल्या ८ महिन्यापासून काम न करू दिल्यामुळे झालेले मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल नुकसानीचा मोबदला व सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेवर कारवाही करा.   गेल्या ८ महिन्यापासून माहे एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यटनाचे आलेले मानधन बँक व्याजासकट मला द्यावे, सर्वे न . ७७ अतिक्रमित जागेवर वनपरिक्षेत्र अधिकारी व सरपंच जर हस्तक्षेप करीत असतील तर संपूर्ण घोट वन परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या अतिक्रमित जागेंवरही कारवाही करावी. 
कोणताही दुजाभाव न करता  मला पूर्ववत रोजगार सेवक या पदावर काम करू द्या. आदी मागण्या घेऊन १७ ऑगस्ट पासून जिल्हा परिषदे समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. आज जि. प. उपाध्यक्षांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली .    Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-19


Related Photos