आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने गडचिरोलीत भव्य बिरसा मुंडा जयंती महोत्सव उत्साहात साजरा!


- बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. सतीशदादा पेंदाम यांची प्रमुख उपस्थिती; गोंडी गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने परिसर दुमदुमला
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी समाजाचे आराध्य दैवत, महान क्रांतिकारक आणि जल, जंगल, जमीन या हक्कांसाठी संघर्ष करणारे धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १८ नोव्हेंबर २०२६ रोजी बिरसा मुंडा चौक, गोकुळनगर, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आदिवासी एकता युवा समिती, गडचिरोली यांच्या वतीने भव्य बिरसा मुंडा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला बिरसा ब्रिगेडचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष इंजि. सतीशदादा पेंदाम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच प्राचार्य डॉ. दिलीप चौधरी, प्रदेशाध्यक्ष वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र तथा सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडा यांच्या महान कार्याचे स्मरण करून त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा, आदिवासी अस्मितेचा, संस्कृतीचा आणि जल-जंगल-जमिनीच्या हक्कांचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर आणि आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीवर मार्गदर्शन केले.
या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे खास तेलंगणा राज्यातून आलेले रेला रवी मेश्राम यांचा गोंडी गीतांचा भव्य ऑर्केस्ट्रा आणि एस. आर. डान्स अकॅडमि नी सादर केलेले समूह नृत्य हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. गोंडी गीतांच्या तालावर आणि आदिवासी संस्कृतीच्या रंगात उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पारंपरिक आदिवासी कला, संस्कृती आणि संगीताच्या माध्यमातून कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या जयंती महोत्सवाच्या आयोजनातून आदिवासी समाजातील एकता, बंधुभाव, सांस्कृतिक वारसा आणि भगवान बिरसा मुंडा यांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार डॉ. देवराव होळी, ज्येष्ठ साहित्यिका कुसुमताई अलाम, डॉ. सचिन मडावी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, रवींद्र वासेकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस पार्टी, पवन गेडाम जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, डॉ. नरेंद्र उंदीरवाडे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अनुसूचित जाती जनजाती विकास परिषद, राज बन्सोड जिल्हाध्यक्ष आझाद समाज पार्टी, माधुरी मडावी प्रदेश महिला सचिव काँग्रेस, प्रकाश अर्जुनवार विश्व शांतिदूत, प्रा हितेश मडावी, डॉ पंकज कुलसंगे व ऍड भैयाजी उईके, महाग्रामसभा अध्यक्ष नितीन पदा, शिवाजी नरोटे सचिव महाग्रामसभा, गुलाबराव मडावी अध्यक्ष कै. बाबुराव मडावी स्मारक समिती गडचिरोली, सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वतीसाठी समितीचे जिल्हाअध्यक्ष अमोल कुळमेथे, उपाध्यक्ष सुधीर मसराम, सचिव प्रदीप कुळसंगे, कोषाध्यक्ष मंगेश नैताम, सहसचिव गिरीश उईके, सल्लागार प्रियदर्शन मडावी, मुकुंदा मेश्राम, संघटक संजय मेश्राम, माणिक गेडाम, संजय उईके, समितीचे सदस्य वासुदेव कोडापे, उमेश उईके, प्रशांत मडावी, आकाश कोडापे, योगेश मडावी, प्रफुल कोडापे, डॉ. कीर्तिकुमार उईके, निलेश कोडापे, रमेश चिकराम, हेमा कुळसंगे, सोनिया टेकाम, प्रवीण कोवे, सह सर्व सदस्यांनी परिश्रम केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्नपूर्णा मसराम व सचिव प्रदीप कुळसंगे यांनी केले, तर प्रास्ताविक सल्लागार प्रियदर्शन मडावी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कोषाध्यक्ष मंगेश नैताम यांनी केले.




Petrol Price




