तेलंगणा राज्यातील कोंडागट्टू देवस्थानाकडे जाणारी बस दरीत कोसळली, ३५ ते ४० भाविकांचा मृत्यू


- पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी पोहचले घटनास्थळी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / हैद्राबाद :
तेलंगणा राज्यातील जेगीत्याल जिल्ह्यातील कोंडागट्टू देवस्थान येथे देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३५ ते ४०   जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज ११ सप्टेंबर रोजी घडली आहे.
तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाची बस करीमनगर जिल्ह्यातील वेमुलवाडा देवस्थान येथून  कोंडागट्टू देवस्थानकडे जात होती. दरम्यान रस्त्यातील दरीत बस कोसळली. यामुळे बसमधील ३५ ते ४० भाविक ठार झाले असून अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळी जेगीत्याल जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारीसुध्दा दाखल झाले. पोलिस प्रशासनातर्फे जखमींना बाहेर काढून करीमनगर येथील हाॅस्पिटलमध्ये हलविले जात आहे. कोंडागट्टू येथे हनुमानाचे मोठे मंदिर असून या ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने जात असतात. माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनीसुध्दा दुःख व्यक्त केले आहे.

   Print


News - World | Posted : 2018-09-11


Related Photos