महत्वाच्या बातम्या

 सेवा संकल्प अभियानांतर्गत शासकीय वसतिगृहात स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती मार्गदर्शन शिबिर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सेवा संकल्प अभियानांतर्गत हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व शिष्यवृती विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अंकेश केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिबिरामध्ये प्राध्यापक राऊत यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, अभ्यासाचे योग्य वेळापत्रक कसे आखावे तसेच उपलब्ध अभ्यास साहित्याचा प्रभावीपणे उपयोग कसा करावा, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच भारत सरकार व राज्य शासनामार्फत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शिष्यवृत्ती योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अर्ज प्रक्रिया तसेच योजनांचा विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे लाभ घ्यावा, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच शासकीय शिष्यवृत्ती योजनांबाबत नव्याने माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमाचा उद्देश वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहित करणे तसेच शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे हा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





  Print






Related Photos