महत्वाच्या बातम्या

 कृषि यांत्रिकीकरण अभियान अंतर्गत कृषि कल्याण अभियान योजना


- कृषी औजारे बँक स्थापने साठी अर्ज आंमत्रित         

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : कृषी यांत्रिकीकरण अभियान २०२२-२३ अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना अंतर्गत भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवठा साठी कृषी औजारे बँक स्थापना प्रति तालुका २ या प्रमाणे ८० टक्के किवा ८ लाख रुपये अनुदानावर राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्ह्यास प्रति तालुका २ या प्रमाणे लक्षांक प्राप्त झालेला आहे. तरी लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी संस्था यांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली कार्यालया मार्फत सबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालायात अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेंचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे संचाचे दरपत्रक व प्रशिक्षण पुरावा, आधार कार्ड सलग्न बँक खात्याचा पासबुकच्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत, संस्थेच्या सबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातून अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व सबंधित व्यक्तीचा आधार कार्ड/ फोटो असलेल्या ओळख पत्राची स्वयंसाक्षांकित प्रत व विहित नमुन्यातील अर्ज २० डिसेंबर २०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात संपूर्ण कागदपत्रासह सादर करावे त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. योजनेच्या अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी केलेले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos