महत्वाच्या बातम्या

 खळबळजनक : अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांच्या वाहनांना लावली आग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : काही असामाजिक तत्त्वांनी वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील पोलीस चौकीसमोर उभ्या पोलिसांच्या ३ वाहनांना आग लावली. यात तिन्ही वाहन पूर्णत: जळाली. आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वसंतराव नाईक झोपडपट्टी यापूर्वी भुरू हत्याकांडावरून चर्चेत राहिली आहे. भुरू हत्याकांडानंतर परिसरात पोलीस चौकी उघडण्यात आली. अधिकारी आणि कर्मचारी येथूनच गस्तीवर निघतात. सीताबर्डी पोलीस ठाण्यात तैनात पोलीस कर्मचारी श्याम पांडे, मोहन पराडकर आणि दिगंबर भोयर यांची शनिवारी कर्तव्यावर हजर होते. तिघांनीही त्यांचे वाहन चौकीसमोर ठेवले आणि सरकारी वाहनांनी गस्तीवर निघाले.

रात्री २ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी चौकीसमोर उभ्या तिन्ही वाहनांना आग लावली. एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. बीटवर निघालेले पोलीस चौकीत परतले. तोपर्यंत तिन्ही वाहनांनी चांगलीच आग पकडली होती. दरम्यान, अग्निशमन विभागाचे एक पथकही घटनास्थळावर पोहोचले. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिन्ही वाहन पूर्णत: जळाले होते. कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली आहे. पोलीस चौकीसमोर पोलिसांचेच वाहन उभे असतात याची माहिती परिसरातील सर्वांनाच आहे. त्यानंतरही आरोपींनी पोलिसांची वाहने जाळली हे आश्चर्यकारक आहे. सध्या आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सीताबर्डी ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.

  Print


News - Nagpur
Related Photos