महत्वाच्या बातम्या

 महिला कबड्डी स्पर्धेत विद्यापीठाच्या आंतर विद्यापीठ सामन्यात ५ राज्यातील ६६ संघांचा सहभाग


विदर्भ न्युज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था  / अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर उद्यापासून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यातून सुमारे ६६ संघ या स्पर्धेत आपले कौशल्य प्रदर्शन करणार आहेत.
चार मैदानांची निर्मिती
आयोजित स्पर्धा तंत्रशुद्ध पद्धतीने संपन्न व्हावे याकरिता विद्यापीठाचे क्रीडा विभागाने चार मैदानांची निर्मिती केली असून आधुनिक विद्यार्थ्यांकरिता उपयोगात आणले आहेत.
स्पर्धेचे परीक्षण
सहभागी झालेल्या संघाच्या सामन्याचे निर्णय न करण्याकरिता जितेंद्र ठाकूर आणि सतीश डफळे यांच्या मार्गदर्शनात पंच व अधिकारी आपल्या सेवा उपलब्ध करणार आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्याकरिता विविध समित्या
विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्र - कुलगुरू विजयकुमार चौबे, तुषार देशमुख, कुलसचिव यांच्या नेतृत्वात विविध समित्या गठीत करण्यात आले असून यामध्ये संलग्नित महाविद्यालयांचे क्रीडा संचालक, स्थानिक क्रीडा मंडळांचे कबड्डी खेळाडू, पदाधिकारी यांचा समावेश करण्यात आले आहे.
उद्घाटन तथा समारोप
सदर स्पर्धेचा उद्घाटन समारंभ विजयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली ८ नोव्हेंबर ला सकाळी ८ वाजता भव्य प्रमाणात आयोजित करण्यात आले असून याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव तुषार देशमुख हे उपस्थित राहतील. स्पर्धेचा समारोप ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता संपन्न होईल.
बाद आणि साखळी सामने
८ नोव्हेंबर पासून बाद फेरीचे सामने संपन्न होणार असून गत वर्षीच्या मानांकित संघांशी त्यांची झुंज साखळी सामन्यात होईल. हे सर्व सामने चुरशीने होणार असून पात्र होणारे चार संघ अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी पश्चिम विभागाचे प्रतिनिधीत्व करतील.
या स्पर्धेत सहभागी होणा-या महिला खेळाडूंचे कौशल्य बघण्याकरिता क्रीडा प्रेमी नागरिकांनी हजर राहावे, असे आवाहन विद्यापीठाच्यावतीने शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक, अविनाश असनारे यांनी केले आहे.

  Print


News - Rajy
Related Photos