महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठाच्या यशात मानाचा तुरा : मराठी विभागातील सहा विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण 


- मराठी विभागाचा बहुमान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने जून २०२२ मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागातील गणेश पोकळे, गायत्री मुळे, रूपेश मेटकर, दत्ता महाले, निकेत चंदिवाले व अर्चना सोळंके हे सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी मिळविलेल्या यशामुळे विद्यापीठाच्या गौरवात मानाचा तुरा रोवला गेला.
विद्याथ्र्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे,  प्र-कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विभागप्रमुख डॉ. मोना चिमोटे तसेच विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे. विद्यार्थी या यशाचे श्रेय समन्वयक डॉ. प्रणव कोलते,डॉ. मोना चिमोटे, डॉ. मनोज तायडे, डॉ. हेमंत खडके, डॉ. माधव पुटवाड, प्रा. भगवान फाळके यांना देतात. जेआरएफ मिळवून पी.एचडी. करणारे अभिजित इंगळे व सारिका वनवे यांचीही या विद्यार्थाना मोलाची मदत झाली.या यशस्वी विद्याथ्र्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos