गडचिरोली जिल्हयातील 'गट क व गट ड' च्या भरतीसाठी सुधारित परीपत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हातील ओबीसींचे आरक्षण ५  टक्क्यावरून १७ टक्के वाढविण्याचा निर्णय नुकताच राज्य मंत्रीमंडळात घेण्यात आला होता. याबाबत काल २३ सप्टेंबर रोजी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने परीपत्रक काढले आहे. यामुळे जिल्हयातील ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वर्ग ३ तसेच वर्ग ४ च्या पदभरतीमध्ये सुधारीत आरक्षणाचा फायदा होणार आहे. इंद्रा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेली आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा तसेच आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गासाठी विहित करण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाची मर्यादा पाळण्यासाठी अनुसूचित जमातीची लोकसंख्या अधिक असलेल्या गडचिरोली, नाशीक, धुळे, यवतमाळ, चंद्रपूर, रायगड, नंदुरबार, पालघर या 8 जिल्हयामध्ये जिल्हास्तरीय गट क आणि गट ड संवर्गातील पदासाठी सुधारीत आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हयात अनु. जातीसाठी १२ टक्के, अनु जमातीसाठी २४ टक्के, विजा अ-३ टक्के, विजा -ब २.५ टक्के, भज क-३.५ टक्के, भज ड -२ टक्के, विमाप्र २ टक्के, इतर मागाास वर्ग १७ टक्के, ईडब्लूएस १० टक्के व खुल्यसा प्रवर्गासाठी २४ टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.
या सुधारित आरक्षणानुसार आदिवासी बहुल जिल्हयाकरीता सुधारित बिंदुनामावली स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील असे शासन निर्णयात नमुद करण्यात आले आहे. हा आदेश काल २३ सप्टेंबर पासूनच लागू करण्यात आला आहे. यामुळे जिल्हयातील पदभरतीमध्ये ओबीसी उमेदवारांचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-09-24
Related Photos