महत्वाच्या बातम्या

 देशात पुन्हा एकदा नोटबंदी : २ हजारांची नोट बंद होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वुत्तसंस्था / नवी दिल्ली  : ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी आणल्या नंतर आता २००० रुपयांची नोट बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. २ हजार रुपयांच्या नोटांचा गुन्हेगारी आणि बेकायदेशीर व्यापारात मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्याचा आरोप करत २ हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनी सभागृहात शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. गेल्या काही दिवसांपासून बाजारात गुलाबी रंगाच्या २,००० रुपयांच्या नोटा दुर्मिळ झाल्या आहेत. एटीएम मधूनही २ हजार रुपयांची नोट मिळत नाही, त्यामुळे २ हजार रुपयांची नोट आता वैध नाही अशी अफवा पसरवली जात आहे. सरकारने या संदर्भात परिस्थिती स्पष्ट करावी अशी मागणी सुशील मोदी यांनी केली आहे.

८ नोव्हंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने नोटबंदीची घोषणा केली होती. या अंतर्गत ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा अवैध घोषीत करत चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. या नोटांच्या बदल्यात सरकारने ५०० च्या नविन आणि २००० हजार रुपयांची नोट बाजारात चलनात आणली. पण भाजप खासदार मोदी यांनी केलेल्या दाव्या नुसार गेल्या वर्षात भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० हजार रुपायांच्या नोटची छपाई बंद केली आहे. तसंच २ हजारांच्या नकली नोटाही मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आल्या आहेत. लोकांनी मोठ्या प्रमाणावर २ हजाराच्या नोटांचा साठा केला आहे. त्याचा वापर केवळ अवैध धंद्यात होत आहे. काही ठिकाणी २ हजारांच्या नोटा ब्लँकने विकल्या जात आहेत. अंमली पदार्थ, मनी लाँड्रिंग आणि दहशतवादासाठी वित्त पुरवठा यासह अनेक गुन्ह्यांमध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याचा आरोप मोदींनी केला आहे. जगातील सर्व आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये मोठ्या नोटांचे चलन थांबलं आहे. बलाढ्य अमेरिकेतही १०० डॉलरची नोट चलनात आहे, १००० डॉलरची नोट दिसत नाही. चीन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपियन देशातही नोटांचं कमाल मूल्य २०० पर्यंतच आहे. केवळ पाकिस्तान आणि श्रीलंका सारख्या देशांमध्ये ५,००० रुपयांच्या नोटा आहेत तर इंडोनेशिया मध्ये १ लाख रुपयांच्या नोटा चलनात असल्याची माहिती सुशील कुमार मोदी यांनी दिली.

भारतात सरकार डिजिटल व्यवहारांवर भर देत आहे. त्यामुळे तसही २००० हजार रुपयांच्या नोटेला अर्थ नाही. त्यामुळे सरकारने हळुहळु २ हजार रुपयांची नोट चलनातून बंद करावी अशी मागणीही सुशील कुमार मोदी यांनी केली आहे. सरकारने लोकांना वेळ द्यावा म्हणजे ते आपल्या जवळच्या २ हजार रुपायांच्या नोटा इतर नोटांमध्ये बदलून घेऊन शकतात. काळाबाजारावर रोख लावायचा असेल तर २ हजार रुपयांच्या नोटेवर बंदी आणावी अशी मागणी सुशील कुमार मोदी यांनी केली.

आर्थिक वर्ष २०१७-१८ दरम्यान २ हजार रुपयांच्या नोटा सर्वाधिक चलनात होत्या. त्यावेळी ३३,६३० लाख नोटा बाजारात होत्या. ज्याचं मूल्य जवळपास ६.७२ लाख करोड इतकं होतं. २०२१ मध्ये केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकसभत माहिती देताना सांगितलं होतं, गेल्या दोन वर्षात २ हजार रुपयांची एकही नोट छापली गेलेली नाही. रिझर्व्ह बँकेनेही २०१९ पासून २००० रुपयांची नोटेची छपाई झाली नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळेच सध्या बाजारात २ हजार रुपायांच्या नोटेचा मोठा तुटवडा भासत आहे.





  Print






News - Rajy




Related Photos