www.nvsp.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच Voter Helpline या मोबाईल अॅपद्वारेही ऑनलाईन मतदार नोंदणी करणे शक्य आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

" /> www.nvsp.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच Voter Helpline या मोबाईल अॅपद्वारेही ऑनलाईन मतदार नोंदणी करणे शक्य आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

"/>
महत्वाच्या बातम्या

 मतिमंद मतदारांच्या नोंदणीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नागरिकांनी मतिमंद मुलांची नावे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीमध्ये नोंदणी करण्याकरीता सहकार्य करावे. त्यासोबतच 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोंबर 2023 रोजी वयाचे 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नवमतदारांनी आपले नाव न चुकता मतदार यादीत समाविष्ट करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोग यांचेकडून प्राप्त सुचनेनुसार (मतिमंद) पात्र मतदारांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. यानुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील सेवायोग मतिमंद मुलांच्या शाळेत 56- नागपूर -पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी हेमा बडे यांचेवतीने नवमतदार नोंदणी करण्यासाठी शिबिर आयोजीत करण्यांत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी नागरिकांना, Mentally Illness, Intellectual Disability. Specific Learning Disabilities, Autism Spectrum Disorder, Mental Behaviour Illness अशा मतिमंद नागरिकांची नावे मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी माहिती अभावी त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे त्यांची सुद्धा नावे मतदार यादीत नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.
शिबीरात नमुना क्रमांक 6 चे एकूण 28 अर्ज भरून घेण्यात आले. सर्व पात्र मतदारांची नोंदणी, वगळणी, दुरुस्ती करण्यासाठी भारत निवडणूक आयोग यांचेकडून www.nvsp.in हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. तसेच Voter Helpline या मोबाईल अॅपद्वारेही ऑनलाईन मतदार नोंदणी करणे शक्य आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos