महत्वाच्या बातम्या

 अग्निवीर योजनेतून देशात क्राइम वाढविण्याचे काम सुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जोरदार टीका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / हिंगोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अग्नीवीर योजनेतून लाखो युवकांना सहा महिने हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण देऊन सैन्यात भरती केले जाणार आहे. चार वर्षानंतर त्यांना बेरोजगार करत घरी पाठवून देशात क्राईम वाढविण्याचे काम केले जाणार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज सोमवारी सकाळी साडेसात वाजता हिंगोली शहरात दाखल झाली. सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत हिंगोली शहरातील शिवलीला लॉन्स येथे जेवण आणि विश्रांतीचा वेळ राखीव होता. त्यानंतर शिवलीला लॉन्स येथून पदयात्रा वडद येथे मुक्कामी असलेल्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाली. वडद गावाच्या अलीकडे असलेल्या हिवरा फाटा येथे साडेसात वाजता पदयात्रा थांबविण्यात आली. या ठिकाणी राहुल गांधी यांनी कॉर्नर सभा घेतली. राहुल गांधी म्हणाले की, मोदी सरकारने सुरू केलेल्या अग्निवीर योजनेतून लाखो युवकांना सहा महिने हत्यार चालविण्याचे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. सहा महिन्याच्या ट्रेनिंगमध्ये परिपूर्ण सैनिक घडू शकत नाही. त्यामुळे देशाचे संरक्षण कसे होणार हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे? तर सहा महिने हत्यार चालविण्याचे ट्रेनिंग घेऊन चार वर्ष नोकरी करून त्यांना बेरोजगार करत घरी पाठविले जाणार आहे. या बेरोजगारीतून देशात मोठय़ा प्रमाणात क्राईम वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.





  Print






News - Rajy




Related Photos