भद्रावतीत दुचाकी चोरीप्रकरणी आरोपी ताब्यात : चोरीची मोटारसायकल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरालगतच्या जेना शेतवस्ती परिसरातून मोटारसायकल चोरीला गेल्याच्या प्रकरणात भद्रावती पोलिसांनी कारवाई करीत आरोपी स्नेहल संतोष महाकुलकर (वय २५), रा. पानवडाळा, ता. भद्रावती याला ताब्यात घेतले आहे. या कारवाईदरम्यान चोरीला गेलेली सुमारे २० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली.
प्राप्त माहितीनुसार, अजय अनिल टोंगे (वय ३६), रा. गौतम नगर, भद्रावती, जि. चंद्रपूर यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ एएल ०६८६ चोरीला गेली होती. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.४५ वाजताच्या दरम्यान जेना शेतवस्ती परिसरातून ही मोटारसायकल चोरीस गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती.
या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अप. क्र. १००२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणातील संशयिताचा शोध घेतला. तपासादरम्यान आरोपी स्नेहल संतोष महाकुलकर याला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीला गेलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.




Petrol Price




