महत्वाच्या बातम्या

 आमगाव येथे १६ वर्षीय मुलीचा अचानक मृत्यू


- प्रकृती खालावल्याने ग्रामीण रुग्णालयात दाखल; वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले मृत घोषित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : आमगाव येथे अचानक प्रकृती खालावल्याने १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी २३ सायंकाळी घडली. स्वाती नरेश खैरे १६ वर्षे, रा. महारिटोला असे मृत मुलीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५:३० ते ६:२५ वाजताच्या दरम्यान स्वातीची अचानक प्रकृती बिघडली. तिची प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी महारिटोला येथील बजलाल मंगरू खैरे ६५ वर्षे यांच्या तक्रारीवरून आमगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मुलीचा मृत्यू अचानक झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.





  Print






Related Photos