गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क पट्ट्यासाठी दावा केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने न्याय द्यावा!


- डॉ.प्रणय भाऊ खुणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो ) नई दिल्ली; अन्यथा गडचिरोली जिल्ह्यात विराट जन आंदोलन!
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटन (असो ) नई दिल्ली जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क पट्ट्या साठी दावा करणाऱ्या जिल्हातील शेतकऱ्यांसाठी पुढाकार घेतल्यानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गोर गरीब शेतकरी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा गडचिरोली यांच्याशी थेट संपर्क साधत आहे.
व आपल्या तक्रारी मांडत आहेत नुकताच चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली, चक चापलवाडा, गोलबंद्री, मंजेगाव,किसान नगर, घोट, येथील ११ शेतकऱ्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटन जिल्हा गडचिरोली यांच्याकडे वनहक्क पट्टे मिळणे संदर्भात तक्रार निवेदन दिले व राष्ट्रीय मानवाधिकार संघटन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय यांच्याकडे न्यायासाठी साकडे घातले, जिल्ह्यातील अनेक शेतकरी सन २०११-१२ पासून छोट्या छोट्या कारणामुळे वन हक्क पट्ट्या पासून वंचित आहेत,परंतु यांचे कोणीही ऐकून घेण्यास तयार नाही, अनेकदा या शेतकऱ्यांना शासनाकडून त्रुटीची पूर्तता करा असे पत्र आले या सर्व शेतकऱ्यांनी वारंवार त्रुटीची पूर्तता केली.
परंतु वन हक्क पट्ट्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अंतिम आदेश मिळाला नाही व आजही त्यांचे वनहक्काचे पट्टे, मिळणे बाबत प्रकरण अंधातरी आहे याबाबत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने अतिशय कठोर भूमिका घेऊन पुढील पावले उचलणार व गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात याबाबत शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार अशी भूमिका घेतली आहे.
वेळ पडेल तर जिल्हाधिकारी कार्यालयावर सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांचा विराट मोर्चा नेऊ असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे यांनी केले, यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, राणी गोपशेटवार उपाध्यक्ष महेश विश्वास, संदीप भोवरे, व विविध तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




