महत्वाच्या बातम्या

 पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचा निरोप समारंभ संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची गडचिरोली येथून पुणे ग्रामीण येथे बदली झाली असून, गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील सा. यांचे प्रमुख उपस्थितीत १० नोव्हेंबर २०२२ रोजी एकलव्य हॉल, पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.

अंकित गोयल यांनी २८ सप्टेंबर २०२० रोजी गडचिरोली जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक पदाचे पदभार स्विकारून जिल्हयाची सुत्रे हातात घेतल्यानंतर सर्व जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त म्हणुन ओळखला जात असल्याने संपुर्ण महाराष्ट्र गडचिरोली जिल्हयाच्या पोलीस अधीक्षकांकडे आस्थेने पहात असते. मात्र पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी गडचिरोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर येथील आव्हानांचा विविध पातळीवर मुकाबला केला. गडचिरोली जिल्हयातील नागरिकांच्या समस्या विचारात घेवून व जनतेसाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला. सोबतच प्रभावी नक्षलविरोधी अभियान राबवुन नक्षलवादयांवर अंकुश ठेवला.

पोलीस अधीक्षक यांनी आपले कार्यकाळात ४७ जहाल नक्षलवाद्यांना अटक २१ चकमकीमधुन नक्षल चळवळीचा वरिष्ठ नेता एमएमसी झोन, सेंट्रल कमिटी मेंबर मिलींद तेलतुंबडे, उत्तर गडचिरोलीचा डीकेएसोसीएम भास्कर हिचामी व सुखलालसह २ डीकेएसझेडसीएम, ८ डीव्हिसीएम व ४ कमांडरसह एकूण नक्षलवाद्यांना ठार तसेच २० नक्षलवादयांचे आत्मसमर्पण घडवुन आणले, एका बाजुला नक्षली कारवायांना पायबंद घालण्याचा प्रयत्न करीत असतांनाच गडचिरोली जिल्हयातील अतिसंवेदनशिल दुर्गम व अतिदुर्गम अशा गावातील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दादालोरा खिडकी हा अभिनव उपक्रम जिल्हाभरात राबवुन वृध्द, महिला, युवक-युवती, बेरोजगार, विदयार्थी, शेतकरी, दिव्यांग यांचेकरीता शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मागिल दोन वर्षांच्या कार्यकाळात २.५ लाग्न नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देवून पोलीस व जनता यांचे संबंध वृध्दींगत केले आहे. गडचिरोली पोलीस प्रशासन हाताळतांना नविन पोलीस मदत केंद्राची गरज लक्षात घेवुन एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम अशा सुरजागड येथे पोलीस मदत केंद्राची निर्मीती केली.

गडचिरोली पोलीस दलाने केलेल्या कार्याची दखल घेवून शासनाने तसेच विविध संस्थांनी पुरस्कार प्रदान केलेले आहेत. ही गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानाची बाब आहे. यामध्ये अरुण बाँगीरवार पब्लीक सव्हीस एक्सलेन्स अवार्ड (ABPSEVA- 2021), स्मार्ट पोलीसींग अवार्ड २०२१ (FICCI) इंटरनॅशनल असोशिएशन ऑफ - चिपस ऑफ पोलीस- २०२२, डॉ. एस. एस. गडकरी अवार्ड फॉर इनोव्हेशन इन पब्लीक ॲडमिनीस्ट्रेशन २०२२, Selected as one of the top Innovetive Practices By Central Government Of India, लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दि ईयर- २०२२ सदरवेळी गडचिरोली जिल्ह्याचा पदभार स्विकारलेले नवनियुक्त पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिता, श्रीमती गोयल, श्रीमती पाठक, गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस मुख्यालयातील सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार, सी-६० पथकातील सर्व पोलीस अधिकारी व कमांडोज, पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व मंत्रालयीन कर्मचारी वर्ग तसेच सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे अधिकारी व अंमलदार व्हिसीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्स) उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos