महत्वाच्या बातम्या

 नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रमासाठी मुख्य कार्याकारी अधिकारी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण फुलोरा उपक्रम उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता ते प्रमाण कमी करण्यांसाठी 15 वा वित्त आयोगातून बालकांना विशेष आहार उपक्रम राबविला. त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण 50% चे वर कमी झाले.

या भरीव आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव आज 30 सप्टेबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात  पुष्पगुछ तथा गौरवशाली सन्मानचिन्ह  देऊन समाजभान जपणारा आदरपूर्वक सत्कार धनंजय साळवे, गट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात आला.या प्रसंगी पंचायत समिती, गडचिरोली चे गट शिक्षणाधिकारी यू. एन. राऊत, सहाय्यक प्रशासन अधिकारी पतकमवार, विस्तार अधिकारी शिक्षण एन. एस. कुमरे,कनिष्ठ प्रशासन अधिकारी एफ एस लांजेवार उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos