महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ३० विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने आयोजित बल्लारपूर तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा २१ ऑगस्ट रोजी तालुका क्रीडा संकुल, विसापूर येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधून जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली अशा विविध गटांमध्ये सामने घेण्यात आले. प्रत्येक गटातून पाच विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्यामुळे एकूण ३० विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर बल्लारपूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला. १४ वर्षांखालील मुले : आदित्य मानवटकर, दर्श पटले, धन्विक वाढगुरे, उज्वल अंबाला व अक्षत मटाले यांची निवड झाली. मुलींच्या गटातून तेजस्विनी स्वामीनाथन, मंजिरी महाडोले, जिनीषा चवरे, आरोही उपरवार व मेहक गिद्वानी यांनी बाजी मारली.

१७ वर्षांखालील मुले : धनंजय वशिष्ठ, मोहम्मद तासिन शेख, आयुष्यमान रोडे, दिवाकर यादव व हितेश सोनटक्के यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली. मुलींच्या गटातून इलाक्षी राऊत, त्रिषा नेताम, माहीका डांगे, अनन्या ढोंगे व निविता पाटील यांनी यश संपादन केले. १९ वर्षांखालील मुले : धवल मैत्रा, हर्षल पावडे, ऋतुराज लोहे, तनवीर पाटील व ओम बोत्रे यांची निवड झाली. मुलींच्या गटातून गीतांजली भारती, सलोनी वर्मा, सालिया पठाण, तेजश्री लोणकर व मानसी महाकालकर यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविली.

ही स्पर्धा तालुका क्रीडा संयोजक किशोर मोहुर्ले यांच्या नियोजनात पार पडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गुलाम अहमद, कैलास शेंडे, उमेश सहारे, स्वप्निल डंभारे, मयूर खारकर, बंडू डोहे, मनोज डे, सुनील कांबळे, शिवराज भरडकर आदींनी सहकार्य केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आयोजक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.





  Print






Related Photos