पंचायती राज प्रतिनिधींची अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा


-स्थानिक समस्यांवर ठेवले जातेय बोट तर अधिकारी करताहेत आवभगत 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
आज सकाळी पोहचलेल्या पंचायती राज समितीमधील काही सदस्यांनी अधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करून जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेतला . चर्चेत आमदार राहुल   मोटे , भरतशेठ गोगवले आणि वीरेंद्र जगताप यांचा समावेश होता .
दरम्यान  विविध शासकीय दरात वाढ , मोफत गणवेश वाटप , आरोग्य विभागातील पदभरती , वर्ग खोल्या वाढविणे , ग्रामीण रस्त्यांमध्ये वाढ , निधीची उपलब्धता व महिला बाल विकास या विषयावर चर्चा करण्यात आली . अतिशय सौहार्दपूर्ण व हसत खेळत चर्चा झाल्यामुळे अधिकाऱ्यांमधील धाक कमी तर झाला नाही ना अशी गपशप कर्मचाऱ्यांमध्ये होती . सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी वर्ध्यात दाखल झालेल्या पंचायती राज समितीकडून अपेक्षा वाढल्या आहेत . पण अधिकारी मात्र आलेल्या समितीच्या आवभगत आणि त्यांना खुश ठेवण्यात गुंतले आहेत . दिनांक ८ आगस्ट ते १० आगस्ट दरम्यान वर्धा जिल्ह्यात हा दौरा होत आहे . एकूण २८ आमदारांची पंचायत राज कमिटीमध्ये समावेश आहे .  Print


News - Wardha | Posted : 2018-08-08


Related Photos