गडचिरोली येथील आणखी २ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांना मिळाला डिस्चार्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारतासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत असून आता गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत असून आतापर्यंत ३८ जण कोरोना पॉझिटीव्ह निघाले आहेत. यापैकी दवाखान्यात भरती असलेल्या २ जण १ जून रोजी बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यापूर्वी ८ कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यामुळे दवाखान्यातून डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या १० झाली आहे. कोरोना पाॅझिटीव्ह आढळलेल्या लोकांपैकी काहीजण उपचारानंतर बरे होत असून त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळत असल्याने कोरोना महामारीमुळे धास्तावलेल्या लोकांना थोडा दिलासा मिळत आहे. काल डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये कोरची व चामोर्शी येथील एक - एक रुग्णाचा समावेश असल्याचे गडचिरोली जिल्हा आरोग्य विभागाने कळविले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-06-02


Related Photos