महत्वाच्या बातम्या

 जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : पोलीस स्टेशन कुही २४ डिसेंबर २०२२ रोजी कुही पोलीसाना गुप्त माहिती मिळाली की, मौजा खापरी फाटा नागपूर उमरेड रोड या मार्गावर काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने काबुल वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन उमरेड रोड क्र. ३५३ डी रोडवर मौजा खापरी फाटा येथे पोलीस स्टेशन कुही येथील पोलीस पथक हे ऑल आऊट व कोबींग ऑपरेशन नाकाबंदी करीत असताना वेळ ०२.०० वा. सुमारास उमरेड कडून नागपूरच्या दिशेने एक विटकरी रंगाचे आयसर ट्रक दिसून आले. पोलीसांनी वाहन थांबवण्याचा इशारा केला, परंतु सदर वाहन चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन न थांबवता काही अंतरावर जावून रोडच्या खाली स्लोप मध्ये उतरवून ईलेक्ट्रीक पोलला भडकले वाहनाजवळ जावून पाहणी केले. असता, आयसर गाडीचा क्र. एम.एच ४० बी.एल ३ हजार ५४२ चा चालक आरोपी मोहमंद रिजवान मोहमद रफीक शेख, (२९) रा. प्लॉट नं. ९५ रफु सुलतान चौक शिवशक्ती नगर, कटोल उपलवाडी नागपूर वाहन चालकाला वाहनामध्ये कोणता मुद्देमाल आहे. असे विचारले असता त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिले. तेव्हा पोलीस स्टाफसह वाहना जवळ जावून पाहणी केले. असता, आयसर कंपनीचा ट्रक डाल्यामध्ये एकुण गोवंशी जनावरे निर्दयतेने डांबून बांधून त्यांना चारापाणी न देता कोंबून दाटीवाटीने अपच्या जागेत जनावरांना त्रास होईल. अशा स्थितीत कल्लोसाठी नेण्या करीता वाहतूक करीत असताना मिळून आले. सदर जनावरांची बाजार किमती १० हजार रु. प्रमाणे २७ जनावरे एकूण किमती २ लाख ७० हजार रूपये तसेच आयसर गाडी किमती ७ लाख रु. असे एकुण चाहनासह ९ लाख ७० हजार रुपयाचा मुद्देमाल जत करण्यात आलेला आहे.

सदर प्रकरणी सरकार तर्फे स.फौ. विजय कुमरे ब.नं. १ हजार ४५३ पो.स्टे. कुही यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कुही येथे वरील आरोपीविरुध्द कलम २७९, ४२७ भादवी सह कलम ११(१), ११(२) (डी), ११(१) (जी) प्रा. छ. प्र. अधि.१९६० सह कलन ५(१) पशु अधि. १९७६ सह कलम १८४. १३०, १७७, ९ मोवा का काययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनकुसरे पोस्टे कुही मीन ९०२१५४२९१८ करीत आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos