माजी केंद्रीय मंत्री अहीर यांच्या ताफ्यातील गाडीच्या अपघातात दोघे ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : 
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला . अपघात इतका भीषण होता की, गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला . अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. हंसराज अहीर अपघातातून बचावले असून सुखरुप आहेत. हंसराज अहीर बसलेल्या गाडीच्या मागे ही गाडी होती.
मिळालेल्या माहितीनुसार, हंसराज अहीर चंद्रपूरहून नागपूरला जात असताना वर्धा जिल्ह्यातील कांडळीजवळ सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हंसराज अहीर यांचे वाहन पुढे गेल्यावर मागचे वाहन कंटेनरला धडकले आणि हा अपघात झाला. अपघातात सीआरपीएफचा चालकही गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान जखमींना ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.  Print


News - Wardha | Posted : 2019-09-26


Related Photos