आगीने घर जळुन नुकसान झालेल्या कुटुंबीयांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट
- केली आर्थीक मदत, इंदिरा नगर येथील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसताना अस्लम पठाण यांच्या घराला आग लागल्याची घटना काल रात्रीच्या सुमारास इंदिरा नगर येथे घडली. या आगीत अस्लम यांचे मोठे आर्थिक नुसकसान झाले आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी पठाण कुटुबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे.
अस्लम पठाण यांच्या घरी विवाह कार्यक्रम होता त्यामुळे ते घरी दिवा लाहून कार्यक्रमाला गेले होते. सदर दिव्यामुळे घराला आग लागली असावी असा अंदाज आता वर्तविला जात आहे. घराला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी पाणी टाकुन आग विजवली मात्र तोवर घरातील सामान जळून खाक झाले होते. यात त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान आज रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इंदिरा नगर येथे जात पठाण कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी आगी मागचे कारण समजून घेतले आहे. तसेच पठाण कुटुबीयांना राषण उपलब्ध करुन देत आर्थिक मदत केली आहे. शासनानेही या घटनेचा पंचणामा करुन शासनातर्फे मिळणार असलेली मदत प्रक्रिया जलद करावी अशा सुचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, रणजित मडावी, फैजान शेख, सुरज कामडे, कुणाल गोंगल, हरिश मतारे, रतन धोके आदींची उपस्थिती होती.
News - Chandrapur