नागपूर : सलूनच्या आड देहव्यापाराचा अड्डा, दोघांना अटक
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्याचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली.
आंबेडकर चौक येथे गबरू युनिसेक्स सलून असून तेथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर सापळा रचून तेथे धाड टाकली असता नितीन प्रकाश पवार (२६) संजय गांधीनगर झोपडपट्टी व निलम उर्फ निशा संजू बानोदे (३५) जुनी शुक्रवारी हे गरीब महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे आढळले. सलूनमध्ये एक महिला आढळली व तिची सुटका करण्यात आली. आरोपींचे मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांच्याविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात पिटा ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक कविता ईसारकर व त्यांच्या पथकाने केली.
News - Nagpur