महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उद्या वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या ३० जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

३० जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजता नागपूर येथून मोटारीने वर्धाकडे प्रयाण करतील. दुपारी २.३० वाजता वर्धा येथे आगमन व सेवाग्राम आश्रम भेट व सेवाग्राम विकास आराखड्यावरील कॉफीटेबल बुकच्या विमोचन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी ३ वाजता तालुका क्रीडा संकुल येथे विविध विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ३.३० वाजता बजाज सार्वजनिक वाचनालय, वर्धा येथे ग्रंथोत्सव उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील मिटींग हॉल येथे सेवाग्राम विकास आराखडा बैठकीस उपस्थिती. सायंकाळी ५ वाजता जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीस उपस्थिती.

सायंकाळी ६ वाजता सिंधूताई सपकाळ सभागृह, वर्धा येथे तळेगाव, तालुका आर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ई-लोकार्पण सोहळा, पोलिसांसाठीच्या हेल्थ मॅनेजमेंट सिस्टीम ॲपचा लोकार्पण सोहळा तसेच अनुकंपा धोरणांतर्गत १८ पोलिस कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेश प्रमाणपत्र व सत्कार समारंभास उपस्थिती. सायंकाळी ६.४५ वाजता देवळी येथे केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत देवळी शहर पाणीपुरवठा योजनेचे भूमीपुजन व रवीदास महाराज सभागृह दलीतवस्ती निधी अंतर्गत परिसरातील सौंदर्यीकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. रात्री ८ वाजता मोटारीने देवळी येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.





  Print






News - Wardha




Related Photos