गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी या उपक्रमास स्व. डॉ. एस. एस. गडकरी या पुरस्काराने सन्मानित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या कार्याची दखल घेवून नुकताच राष्ट्रीय स्तरावरील HIPA (Indian Institute of public Administration) भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकप्रशासन २०२१-२०२२ मधील नवोपक्रमासाठीचा स्व. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना जाहिर करण्यात आला. सदरचा पुरस्कार मंत्रालयातील समिती कक्ष येथे भारतीय लोक प्रशासन संस्थेची महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या दरम्यान हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी तर्फे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना सन्मानित करण्यात येणार आहे. HIPA चा भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकप्रशासन २०२१-२०२२ मधील नवोपक्रमासाठीचा स्व. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार राष्ट्रीय स्तरावर मागास घटकांसाठी उत्कृष्ठ काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींसाठी दिला जातो.
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील वृध्द, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, आत्मसमर्पीत नक्षलपिडीत तसेच आदिवासी नागरिकांच्या विकासाबाबत गांभिर्याने विचार करून गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती शाखेतर्गत पोस्टे / उपपोस्टे व पोमकेंच्या ५३ ठिकाणी पोलीस दादालोरा खिडकी सुरु केल्या आहेत. या पोलीस दादालोरा खिडकीमधून एकाच ठिकाणी नागरिकांना १) प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र २) प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना ३) विविध प्रकारचे दाखले ४) गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ५) व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना ६) अग्निवीर ऑनलाईन अर्ज ७) प्रोजेक्ट कृषी समृध्दी ८) प्रोजेक्ट शक्ती तसेच शासनाचे इतर विविध उपक्रमाच्या माध्यमातून दोन लाखांचेवर दुर्गम व नक्षलग्रस्त भागापर्यंत पोहचून विविध योजनेचा लाभ मिळवून दिला आहे व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून २,२६,१९० नागरिकांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळालेला असून, प्रोजेक्ट प्रगती अंतर्गत जात प्रमाणपत्र ९,३९० प्रोजेक्ट विकास अंतर्गत विविध प्रकारच्या योजना- ५८,८३१ विविध प्रकारचे दाखले १,२६,४४८ गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना- १७०, व्होकेशनल ट्रेनिंग व रोजगार योजना- ६,२१८, अग्निवीर ऑनलाईन अर्ज १७३, प्रोजेक्ट कृषी समृध्दी १२,९१८, प्रोजेक्ट शक्ती १,६८६ व इतर उपक्रम १०,५२५ अशाप्रकारचा लाभ नागरीकांना मिळवून देण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, पोलीस दलास अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. गडचिरोली जिल्हयातील उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय/पोस्टे/उपपोस्टे / पोमके येथील सर्व अधिकारी / अंमलदार यांनी या आव्हानांना स्विकारुन जिल्हयातील गरजु आदिवासी बांधवांपर्यंत जावून पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी परिश्रम घेवुन उत्कृष्ट कामगिरी पार पाडली आहे. राष्ट्रीय स्तरावरील IIPA भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकप्रशासन २०२१ २०२२ मधील नवोपक्रमासाठीचा "स्व. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार जाहिर झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्यावतीने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी जिल्हयातील सर्व अधिकारी / अंमलदार यांचे कौतुक केले असून भविष्यात देखिल ते अशीच कामगिरी करतील ही अपेक्षा व्यक्त केली.
News - Gadchiroli