महत्वाच्या बातम्या

 लोकबिरादरी आश्रम शाळेच्या २६ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड


- भामरागड प्रकल्प सलग चौदाव्यांदा विभागीय विजेता

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भामरागड : 
आदिवासी विकास विभागांतर्गत घेण्यात आलेल्या नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील २६ खेळाडू विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड पक्की केली आहे. सदर खेळाडू विद्यार्थ्यांच्या उत्तम कामगिरीमुळे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आदिवासी विकास प्रकल्प भामरागडने विभागीय क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद चौदाव्यांदा कायम राखले आहे. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२३ दरम्यान नागपूर येथे झालेल्या आदिवासी विकास विभागाचे क्रीडा स्पर्धेत लोकबिरादरी आश्रम शाळेच्या १२ खेळाडू विद्यार्थी व १४ विद्यार्थींनी खेळाडू अशा २६ खेळाडूंनी विविध खेळ प्रकारात उत्तम कामगिरी करीत घवघवीत यश संपादन केले.

१० फेब्रुवारी २०२३ पासून नाशिक येथे सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. प्राविण्य प्राप्त विद्यार्थी खेळाडू १४ वर्षे वयोगट मुली रोशनी माडकामी -४०० मी. प्रथम, ६००मी.प्रथम, रितीका मडावी-४०० मी.द्वितीय, ६०० मी.द्वितीय. १४ बबिता काळंगा २०० मी प्रथम, वर्षे वयोगट मुले आकाश महा-४०० मी. प्रथम, ६०० मी. प्रथम, सुरज दुर्वा-४०० मी. द्वितीय,६०० मी. द्वितीय, दिपक दुर्वा २०० मी. द्वितीय. १७ वर्षे वयोगट मुली- वनिता पुंगाटी-८०० मी. प्रथम, १५०० मी. प्रथम, सदिया मट्टामी -८०० मी. द्वतीय, १५०० मी. द्वितीय, चेतना माडकामी-३००० मी. प्रथम, ३ कि.मी.चालणे द्वितीय.

१७ वर्षे वयोगट मुले- विलास मेट्टामी -४००मी. द्वितीय, ८०० मी. प्रथम,२०० मी.द्वितीय, साईनाथ पुंगाटी-१५०० मी. प्रथम, सुखान विडपी-१५०० मी.द्वितीय, ३००० मी. प्रथम, युवराज पुंगाटी- ५ कि.मी.चालणे प्रथम. १९ वर्षे वयोगट मुली जमुना मज्जी-४०० मी. प्रथम, लाली उसेंडी ४०० मी. द्वितीय, मुन्नी मडावी १५०० मी. प्रथम, ३००० मी. प्रथम, लक्ष्मी पुंगाटी-१५००मी. द्वितीय, ३ कि.मी ‌‌चालणे प्रथम, अश्विनी मिच्छा ३००० मी. द्वितीय. १९ वर्षे वयोगट मुले गणेश गोटा १५०० प्रथम एकूण २६ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सुयश संपादनासाठी जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे, लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे , लोकबिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे, मुख्याध्यापक श्रीराम झोडे यांनी सर्व प्राविण्य खेळाडू विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांचे अभिनंदन करुन राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी सुयश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos