महत्वाच्या बातम्या

 साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन होणार 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / पुणे : राज्यातील साखर कारखान्यामध्ये ऊस वजन काट्यात फसवणूक होत आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांत उसाच्या वजनामध्ये घट आली आहे. या पार्श्‍वभूमीवर पुढील हंगामापासून साखर कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाइन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

यासंदर्भात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची बैठक झाली. नोव्हेंबरमध्ये सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे ऑनलाइन करण्याबाबत वजनकाटे महानिरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.

पाठपुरावा करून वजनकाटे ऑनलाइन करण्यासाठी अनेक तज्ज्ञांच्या भेटी घेण्यात आले. यानंतर संगणक तज्ज्ञ यांनी राज्यातील वजनकाट्यावर ऊस गाडी वजनास आल्यानंतर त्या ऊसाचे वजन एकाच वेळेस शेतकरी, साखर कारखाना व साखर आयुक्त यांना कळावे. कोणत्याही कारखान्याने छेडछाड केली तर त्याचे नियंत्रण साखर आयुक्त यांच्याकडे असल्याने याबाबत त्यांना तातडीने तसा मेसेज पोहचविण्याची व्यवस्था या प्रणालीमध्ये असणार आहे.





  Print






News - Rajy




Related Photos